महापालिकेच्या वतीने विशेष कॅम्प

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शहरातील ज्या मिळकतीवर (इमारतींवर), खुल्या जागेवर अद्यापही कर आकारणी केलेली नाही अथवा ज्यांनी अद्याप मिळकतीवर मालमत्ता कराची आकारणी करुन घेतलेली नाही अशा मिळकतधारकांसाठी विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. हा कॅम्प सोमवार दि.17 ते 20 ऑक्टोंबर 2022 या चार दिवसाच्या कालावधीमध्ये आयोजीत करण्यात आला आहे.

सोमवार, दि.17 ऑक्टोंबर 2022 रोजी विभागीय कार्यालय क्रं.1 गांधी मैदान (घरफाळा ऑफिस) येथे सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत, मंगळवार, दि.18 ऑक्टोंबर 2022 रोजी विभागीय कार्यालय क्रं.2 छ.शिवाजी मार्केट (घरफाळा ऑफिस) येथे सकाळी 10 ते दुपारी 4  या वेळेत, बुधवार, दि.19 ऑक्टोंबर 2022 रोजी विभागीय कार्यालय क्रं.3 राजारामपूरी (घरफाळा ऑफिस) येथे सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत व गुरुवार, दि.20 ऑक्टोंबर 2022 रोजी विभागीय कार्यालय क्रं.4 ताराराणी मार्केट (घरफाळा ऑफिस) येथे सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत विभागीय कार्यालयनिहाय कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियममधील कराधान नियम 8 कलम 5 (1) नुसार कर आकारणी करुन दिली जाणार आहे.

यासाठी  प्रॉपर्टी कार्ड/सातबारा उतारा/इंडेक्स उतारा/सेल डिड/ कब्जेपट्टी/ झोपडपट्टी कार्ड, बांधकाम परवानगी/प्रारंभ प्रमाणपत्र/भोगवटा प्रमाणपत्र/प्रथम लाईट बिल, अपार्टमेंट असलेस बिल्डर/डेव्लपर यांचे पूर्ण नांव व पत्ता याबाबतची कागदपत्रे आणावीत. तसेच ज्या मिळकतींना यापूर्वी कराचे देयक येत होते परंतु आता येत नाही अशा मिळकतधारकांनी देयकाची छायांकीत प्रत व कर भरणा केलेल्या पावतीची छायांकीत प्रत आणावी. तरी संबंधीत मिळकतधारकांनी आवश्यक त्या कागदपत्रासह महापालिकेने ठरवून दिलेल्या दिवशी विभागीय कार्यालयात आपले अर्ज सादर करावेत असे आवाहन घरफाळा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

🤙 9921334545