नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे. आज (शुक्रवारी) दुपारी तीन वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे.
या पत्रकार परिषदेत हिमाचल प्रदेश आणि गुजरातमधील निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज होणाऱ्या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.हिमाचल प्रदेश आणि गुजरातमध्ये भाजपच्या नेतृत्वातील सरकार आहे. दोन्ही राज्यात भाजप विरोधात काँग्रेस अशी लढत आहे. मात्र, गुजरातमध्ये आम आदमी पक्षाच्या कामगिरीकडेही अनेकांचे लक्ष लागले आहे.