मांसाहार जाहिरातीवर उद्या सुनावणी

मुंबई वृत्तसंस्था : मांसाहार जाहिरातबाजी संदर्भात जैन संस्थांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर उद्या सोमवारी उच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे.

सार्वजनिक ठिकाणी आणि टीव्हीसह इतर मीडियाच्या माध्यमातून करण्यात येणारी मांसाहारशी संबंधित जाहिरातबाजी बंद करण्यात यावी. अशी मागणी करत काही जैन संस्थांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या जाहिरातींमुळे त्यांच्या शांततेत जगण्याच्या मुलभूत अधिकारावर गदा येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या याचिकेत म्हटलं आहे की, जर कुणाला मांसाहार करायचा असेल तर त्यांनी तो खुशाल करावा, मांसाहाराला आमचा विरोध नाही. पण शाकाहारी लोकांच्या घराजवळ त्याची जाहीरात करणं हे त्या समुदायाच्या मुलभूत अधिकारांवर गदा आणल्यासारखं आहे, असा आरोप या जनहीत याचिकेतून करण्यात आला आहे. श्री ट्रस्टी आत्म कमल लब्धीसुरीश्वरजी जैन ज्ञानमंदिर ट्रस्ट, सेठ मोतीशा धर्मादाय ट्रस्ट आणि श्री वर्धमान परिवार आणि ज्योतींद्र शाह यांनी एकत्रितपणे ही याचिका दाखल केली आहे.

याचिकेत गुजरात, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांनी अश्याप्रकारची बंदी लावल्याचा दाखलाही देण्यात आला आहे. यामुळं मांसाहाराच्या जाहिरातींवर सरसकट बंदीची मागणी करत हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. आता या प्रकरणात उद्या हायकोर्ट काय निर्णय देते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. 

🤙 8080365706