भैय्या मानेंची समरजीत घाटगेंवर ‘या’शब्दांत टीका

कागल प्रतिनिधी : आमदार हसन मुश्रीफ यांनी गेल्या २५-३० वर्षात गोरगरिबांच्या कल्याणाचे समाजकारण केले. राजकीय विद्वेषातून समरजीत घाटगे मात्र त्यांच्यावर भांडवलदार असल्याची टीका करीत आहेत. लोकशाहीला न मानणा-या जहागीरदार समरजीत घाटगे यांची राजेशाही मोडून काढूया, असे आव्हान केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने यांनी दिले. गोरगरीब जनता हेच आमदार हसनस मुश्रीफ यांचे भांडवल आहे, असेही ते म्हणाले.पिंपळगाव बुद्रुक ता.कागल येथे तीन कोटी निधीच्या विकासकामांचे उद्घाटन व कामगारांना सुरक्षा साहित्य वाटप अशा संयुक्त कार्यक्रमात माने बोलत होते.  प्रमुख पाहुणे म्हणून आमदार हसन मुश्रीफ व अध्यक्षस्थानी माजी आमदार संजयबाबा घाटगे होते.

पुढे बोलताना भैय्या माने म्हणाले की, आमदार हसन मुश्रीफ सरकारी योजनाच राबवीत असल्याची टीका समरजीत घाटगे करीत आहेत. आमदार हसन मुश्रीफ व माजी आमदार संजयबाबा घाटगे हे गोरगरीब जनतेचे ब्रँड आहेत. समरजीत घाटगे यांच्यासारखे ते जहागीरदारी आणि राजेशाहीचे पुरस्कर्ते नाहीत. 

यावेळी ज्येष्ठ जिल्हापरिषद सदस्य युवराज पाटील, जिल्हा परिषद सदस्य मनोजभाऊ फराकटे, कागल तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विकास पाटील, पोलीस पाटील बापूसाहेब पाटील, शामराव पवार, उपसरपंच युवराज डाफळे, दत्ता पाटील, राजू पाटील, मिलिंद माने, सतपाल माने, सोनबा माने, शंकर पाटील, पंडित सूर्यवंशी, केशव माने, भरत पाटील, सदाशिव माने, शरद पवार आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.स्वागत अजित पाटील यांनी केले. प्रास्ताविक रघुनाथ माने यांनी केले. सूत्रसंचालन विवेक गवळी यांनी केले. आभार सरपंच बंडेराव सूर्यवंशी यांनी मानले.