कसबा बावडा प्रतिनिधी : डी.वाय.पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चर, कसबा बावडा या महाविद्यालयाच्या यावर्षी पासआउट झालेल्या बॅचची विद्यार्थिनी पूजा माळी हिला ‘वाडे एशिया बेस्ट स्टुडन्ट’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आर्किटेक्चरच्या पदवी अभ्यासक्रमातील अंतिम वर्षातील ‘सस्टेनेबल गेटवे, तिलारी’ या डिझाइन थिसीससाठी तिला सदर पुरस्कार देण्यात आला आहे.
महिला आर्किटेक्टस, आर्टिस्ट्स व डिझाइनर्स यांच्या कामाला आर्किटेक्चर विश्वामध्ये नवीन ओळख निर्माण करून देणे, त्यांच्या कामाचे डॉक्युमेंटेशन करणे व दृष्टीक्षेपात आणणे या हेतूने ‘वाडे ऐशिया’ या प्लॅटफॉर्मची निर्मिती करण्यात आली आहे. संपूर्ण देशभरातील १२०० सहभागींपैकी ८ विद्यार्थिनी यात शॉर्टलिस्ट झाल्या होत्या. २ सप्टेंबर रोजी झालेल्या थेट मुलाखतीमधून पूजा हिची सदर पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष माजी गृहराज्यमंत्री सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. लितेश मालदे, वास्तुशास्त्र विभाग अधिष्ठाता प्रा. आर. जी. सावंत, विभाग प्रमुख प्रा. आय. एस. जाधव, प्रा. तेजस पिंगळे व सर्व प्राध्यापकानी अभिनंदन केले आहे.