इचलकरंजी (प्रतिनिधी) : एक हजार रुपयांची लाच घेताना इचलकरंजी महापालिकेतील लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. बाबासाहेब अण्णा माळी,वय ५८ वर्षे,रा. लक्ष्मीनगर, रुकडी, ( ता. हातकणंगले) असे संशयित आरोपीचे नाव आहे.

आईच्या वैद्यकीय बिलाची फाईलमधील त्रुटी न काढता मंजूर करून दिल्याबद्दल इचलकरंजी महापालिकेतील लिपिक बाबासाहेब अण्णा माळी,वय ५८ वर्षे,रा रा. लक्ष्मीनगर, रुकडी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर याला लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले.
सदर कारवाई पोलीस उप अधीक्षक कोल्हापूर आदिनाथ बुधवंत यांनी केली. सापळा पथकात पो.नि.नितीन कुंभार, पो उ.नि. संजीव बंबरगेकर, पो.ना.विकास माने, पो.ना.सुनील घोसाळकर, पो.ना.नवनाथ कदम, पोहेकॉ विष्णू गुरव सहभागी होते.

