न्यू पॉलिटेक्निकचा ३९ वा वर्धापन दिन उत्साहात

कोल्हापूर : श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित उचगांव येथील न्यू पॉलिटेक्निकचा ९ ऑगस्ट क्रांतीदिनी ३९ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला. वर्धापन दिनी प्राचार्य डाॅ. संजय दाभोळे व सर्व स्टाफच्या उपस्थितीत काॅलेजमधील सर्वात ज्येष्ठ कर्मचारी म्हणून सिव्हिल इंजिनिअरिंग विभागप्रमुख डाॅ. विनायक दिवाण यांच्या हस्ते केक कापून आनंदोत्सव झाला.


न्यू पॉलिटेक्निकची स्थापना ९ ऑगस्ट १९८३ रोजी संस्थेच्या शिवाजी पेठ कोल्हापूर येथील प्रांगणात झाली. सुरूवातीला तीन कोर्सेस घेवून संस्थेने तंत्रशिक्षणामध्ये पहिले पाऊल टाकले. आज त्या रोपट्याचा वटवृक्ष झाला असून सद्ध्या येथे सहा कोर्सेस उपलब्ध आहेत. १९८३ पासून आजतागायत तंत्रशिक्षण घेवून बाहेर पडलेल्या तब्बल ३७ बॅचेसमधील अभियंते विविध क्षेत्रात देशपातळीवर तसेच विदेशातही आपली सेवा बजावत आहेत. विशेष बाब म्हणजे, सुरूवातीच्या बॅचेसमधील विद्यार्थ्यांची मुलेही आता न्यू पॉलिटेक्निकमधून अभियंता झालेली आहेत.

प्राचार्य डाॅ. दाभोळे यांनी मार्गदर्शन करताना आज ‘न्यू पॉलिटेक्निक’ हा जो तंत्रशिक्षणामध्ये ब्रॅण्ड निर्माण झाला आहे, त्यामागे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे विचार व संस्कार, ‘प्रिन्स शिवाजी’ संस्थेचे पाठबळ आणि न्यू पॉलिटेक्निकच्या सुरूवातीपासूनच्या स्टाफचे बहुमोल कष्ट असल्याचे नमूद केले आणि या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. हा ‘न्यू पॉलिटेक्निक’ ब्रॅण्ड आता तंत्रशिक्षणामध्ये एक बेंचमार्क म्हणून नावारूपास आणण्यास आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले. तसेच, विद्यार्थी हिताच्या नवनवीन योजना आपण आणणार असल्याचे सांगितले.


यावेळी, वर्ष २०२१-२२ मध्ये विविध कार्यांद्वारे आपले बहुमोल योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्र देवून सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन विभागप्रमुख प्रा. सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ऑटोमोबाईल विभागातील स्टाफनी केले. प्रा. वैभव पाटणकर यांनी सूत्रसंचालन केले.

🤙 8080365706