राधानगरी धरणाचे दोन दरवाजे उघडले; पंचगंगा धोका पातळीकडे

कोल्हापूर : गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राधानगरी धरण भरले असून आज सकाळी धरणाचे दोन दरवाजे उघडले आहेत. 5.30 वाजता धरणाचे सहा क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा उघडला तर 8.30 वाजता पाच क्रमांकाचा दरवाजा उघडला असून धरणातून 4456 क्यूसेक्स विसर्ग सुरु आहे.

दरम्यान, पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली असून धोका पातळीकडे वाटचाल सुरु आहे.
राजाराम बंधाऱ्यावर पाणी पातळी ४० फूट ०१ इंच इतकी आहे. (पंचगंगा नदी इशारा पातळी -३९ फूट व धोका पातळी – ४३ फूट आहे.) जिल्ह्यातील ७४ बंधारे पाण्याखाली आहेत. अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अनेक गावांत स्थलांतर सुरु आहे.

आज सकाळी 5.30 वाजता राधानगरी धरणाचे स्वयंचलित द्वार क्रमांक 6 उघडले. तर सकाळी साडे आठ वाजता सहा क्रमांकाचा दरवाजा उघडला.
विसर्ग 2856 व पाॅवर हाऊसमधूनचा 1600 असा एकूण 4456 क्यूसेक्स विसर्ग सुरु आहे, अशी माहिती पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांनी दिली..

कोल्हापूर सांगली आणि सातारा या जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीमुळे शिवाजी विद्यापीठाच्या दिनांक १० व ११ ऑगस्ट २०२२ रोजीच्या आयोजित करण्यात आलेल्या परीक्षा स्थगित करण्यात येत आहेत. या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे.

🤙 9921334545