डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या अनामिकाला ‘ॲडोबे’कडून 60 लाखांचे पॅकेज

कसबा बावडा (वार्ताहर) : डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या अनामिका राजाराम डकरे हीला ‘ॲडोबे’ या जगविख्यात कंपनीमध्ये तिला तब्बल 60 लाख रुपयांच्या वार्षिक पॅकेजवर नोकरी मिळाली आहे. या यशाबद्दल डी. वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते हॉटेल सयाजी येथे झालेल्या कार्यक्रमात अनामिकाच सन्मान करण्यात आला.

करवीर तालुक्यातील सोनाळी या ग्रामीण भागातून आलेली अनामिका डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात तृतीय वर्ष सगणक विभागात शिक्षण घेत आहे. पदवीचे शेवटचे वर्ष शिल्लक असतानाच तिला ‘ॲडोब’कडून ‘ टेक्निकल ऑफिसर ’ या पदावर निवड केली हे. याच कंपनीने डिसेम्बर २०२१ मध्ये प्रोडक्ट इंटर्न म्हणून १ लाख रुपये विद्यावेतनावर तिची निवड केली होती. इंटर्नशिप कालावधी संपल्यानंतर तिला वार्षिक ६० लाख रुपयांच्या पॅकेजवर पूर्णवेळ नोकरीसाठी निवड केली आहे.


अनामिकाचे वडील शिक्षक असून त्यांच्या नोकरीनिमित्त ते कोल्हापुरात स्थायिक झाले आहेत. इंजिनिअर होणारी ती कुटुंबातील पहिलीच मुलगी आहे. शासकीय तंत्रनिकेतनमधून डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर तिने डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात थेट दुसऱ्या वर्षासाठी तिने प्रवेश घेतला. गुणवत्तापूर्ण शिक्षण, व्यक्तिमत्व विकास, विविध अक्टीव्हीटी, उत्तम प्लेसमेंट परंपरा यामुळे याच महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा हे पाहिल्या पासूनच ठरवले होते. नृत्याची आवड असल्याने त्यालाही याठिकाणी वाव मिळेल याची खात्री होती, असे अनामिका सांगते.

कार्यकारी संचालक डॉ अनिलकुमार गुप्ता यांनी सांगितले की, महाविद्यालयात प्लेसमेन्टच्या दृष्टीने पहिल्यापासूनचा चांगली तयरी करून घेतली जाते. ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाकडून त्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. त्यामुळेच पहिल्याचा प्रयत्नात ‘ॲडोब’ सारख्या जगविख्यात कंपनीमध्ये अनामिका यश मिळाले आहे. टीपीओ प्रा. सुदर्शन सुतार व प्राधायपक वर्गाचे मार्गदर्शन व सहकार्य आणि तिची स्वतःची मेहनत व जिद्द यांचाही मोठा वाटा आहे.

अनामिकाने मिळवलेल्या या यशाबद्दल महाविद्यालयाच्यावतीने हॉटेल सयाजी येथे तिचा सत्कार करण्यात आला. डी. वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील यानी अनामिकाचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी तिला शुभेच्छा दिल्या. यावेळी अनामीकाचे वडील राजाराम, आई अस्मिता, भाऊ यांच्यासह डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. अनिल कुमार गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोषकुमार चेडे, रजिस्ट्रार डॉ. लीतेश मालदे, डीन डॉ. जी. ए. पाटील, टीपीओ प्रा. सुदर्शन सुतार, हेड ट्रेनिंग प्रा. मकरंद काईंगडे आदी उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष गृहराज्य मंत्री सतेज पाटील यांनी अभिनंदन केले आहे.