जगदीप धनखड नवे उपराष्ट्रपती

नवी दिल्ली : उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत जगदीप धनखड यांनी बाजी मारली आहे. त्यांनी विरोधकांचे उमेदवार मार्गारेट अल्वा यांचा पराभव केला आहे. धनकड यांना 528 मतं तर मार्गारेट अल्वा यांना 182 मतं मिळाली.

धनखड 11 ऑगस्टला उपराष्ट्रपती पदाची शपथ घेणार आहेत. विद्यमान उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ 10 ऑगस्टला संपणार आहे. लोकसभेचे महासचिव उत्पल कुमार सिंह यांनी दिलेल्या माहतीनुसार. धनखड यांना 725 मतांपैकी 528 मते मिळाली. 346 मतांनी त्यांचा विजय झाला आहे. तर 15 मते अवैध ठरली आहेत. विरोधी पक्षाच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांना 182 मतं मिळाली. उपराष्ट्रपतीपदासाठी 92.94 टक्के मतदान झाले होते.

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत 725 खासदारांनी मतदान केले आहे. टीएमसीच्या 34, भाजपच्या दोन, शिवसेनेच्या दोन आणि बीएसपीच्या एका खासदाराने मतदान केले नाही. सनी देओल विदेशात आणि संजय धोत्रे हॉस्पिटलमध्ये असल्यानं मतदान केले नाही. शिवसेनेकडून अरविंद सावंत, विनायक राऊत, गजानन कीर्तीकर, संजय जाधव, राजन विचारे हे देखील मतदानासाठी अनुपस्थित होते.

🤙 9921334545