बहिरेश्वर येथे मोबाईलचा स्फोट

बहिरेश्वर (प्रतिनिधी) : बहिरेश्वर येथील शेतकरी कृष्णात उर्फ राजबा हावलदार यांच्या खिशातील मोबाईलचा स्फोट होऊन जळून खाक झाला.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार राजबा हावलदार सकाळी आपल्या जनावारांना गोट्यात चारा घालत होते. त्यांच्या शर्टच्या वरच्या खिशातून अचानक धूर येवु लागला, त्यावेळी त्यांनी प्रसंगावधान राखत जनावरांच्या गोठ्यातून बाहेर पडले.

मोबाईल खिशातून बाहेर फेकुन दिला. त्यावेळी त्यांच्या हाताला किरकोळ इजा झाली. मोबाईल जळुन खाक झाला.