पुणे : बंडखोर आमदार आणि आक्रमक शिवसैनिक यांच्यातला संघर्ष हा टोकाला गेला आहे. एकनाथ शिदे यांच्याबरोबर गेलेले बंडखोर आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केला आहे. यामध्ये उदय सामंतांची गाडी शिवसैनिकांकडून फोडण्यात आलेली आहे.

शिवसेना ते तानाजी सावंत यांच्या घराकडे जाताना हा प्रकार घडलेला आहे. सभा संपल्यानंतर कात्रज चौकात अवघ्या काही मिनिटात शिवसैनिकांनी हा हल्ला चढवलेला आहे. तर यावेळी गद्दारी केली म्हणत जोरदार घोषणाबाजी करण्यात आलेली आहे.
