द्रोपदी मुर्मू यांचा विजय; 25 जुलैला राष्ट्रपतीपदाचा शपथविधी


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रोपदी मुर्मू यांचा विजय झाला आहे. यूपीएचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा या निवडणुकीत पराभव झाला आहे.

राष्ट्रपतीपदासाठी १८ जुलै रोजी मतदान झाल्यानंतर आज गुरुवारी २१ जुलै रोजी सकाळी ११ वाजेपासून संसद भवनात मतमोजणीला सुरुवात झाली होती. द्रौपदी मुर्मू यांच्या रुपाने देशाला पहिल्या आदिवासी समाजाच्या महिला या राष्ट्रपतीपदी विराजमान होणार आहेत. विशेष म्हणजे देशासाठी ही अत्यंत अभिमानाची बाब आहे की, द्रौपदी मुर्मू या देशाच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती असणार आहेत. द्रौपदी मुर्मू विजयानंतर आता 25 जुलैला राष्ट्रपतीपदाची शपथ घेतील. त्याआधी म्हणजेच 24 जुलै सध्याचे विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ संपणार आहे.

मतमोजणी आधीच द्रौपदी मुर्मू यांचा विजय निश्चित मानला जात होता. कारण भाजपने या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांना विजय मिळावा यासाठी प्रचंड मोर्चोबाधणी केलेली होती. दरम्यान निवडणुकीत काही खासदार आणि आमदारांनी या निवडणुकीत क्रॉस वोटिंग केल्याचं समोर आलं आहे.

द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत 64 टक्के मते मिळाली तर यशवंत सिन्हा यांना 36 टक्के मते मिळाली.
एकूण 4754 मतदान झाले. त्यापैकी 4701 वैध आणि 53 अवैध. कोटा (राष्ट्रपती निवडून येण्यासाठी उमेदवारासाठी) 5,28,491 होता. द्रौपदी मुर्मू यांना 2824 प्रथम पसंतीची मते मिळाली – ज्याचे मूल्य 6,76,803 आहे. यशवंत सिन्हा यांना 1,877 प्रथम पसंतीची मते मिळाली – मूल्य 3,80,177.

🤙 9921334545