ओबीसी आरक्षणच्या धरतीवर मराठा आरक्षण द्यावे विभागीय आयुक्तांना निवेदन

मुंबई (वृत्तसंस्था); ओबीसी आरक्षण ज्या पद्धतीने दिले गेले  त्याच पद्धतीने मराठा आरक्षणाचा निर्णय घ्यावा, यासाठी मराठा क्रांती मोर्चा व बुलंद छावातर्फे मुख्यमंत्र्यांकडे मागणी करण्यात आली आहे. गुरुवारी विभागीय आयुक्तांमार्फत निवेदन सादर करण्यात आले.

ओबीसी आरक्षणाचा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय स्वागतार्ह आहे. जनभावनेचा आदर करत महाराष्ट्र सरकारने मार्च महिन्यात बांठीया आयोग स्थापन केला होता.  आयोगाने अवघ्या चार महिन्यांत सर्व डेटा सर्वोच्च न्यायालयात सकारात्मकतेने दाखल केला. आता मराठा आरक्षण न्यायप्रविष्ट आहे. पण मराठा समाजातील प्रत्येक व्यक्ती आरक्षणाची आस लावून बसलेला आहे.

आज घडीला महाराष्ट्रातील करोडोंच्या संख्येतल्या मराठा समाजाचे भवितव्य आरक्षणाविना अंधारमय आहे. तरी नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आरक्षणा प्रमाणेच मराठा आरक्षणाचा प्रश्नही हाती घेऊन समाजाला आरक्षण मिळवून द्यावे.यावेळी

.सुरेश वाकडे, सतीश वेताळ, मनोज गायके, प्रदीप हारदे , ज्ञानेश्वर जाधव ,योगेश देशमुख, बाबासाहेब चौधरी, अनिल तुपे , संदीप शेळके, शिवाजी बिंगारे आदींच्या निवेदनावर स्वाक्षरी आहे.