वडिलांनी आपल्या अपंगावर मात करत मुलीला यशाच्या शिखरावर पोहचवले

कोल्हापूर (प्रतिनिधी): येथील सुनिल कमलाकर हे एका पायाने अपंग असून या त्यांनी आपल्या उदरनिर्वाहासाठी कुरूंदवाड येथे चहाचा गाडा चालवतात.आपल्या जीद्द्च्या जोरावर आपल्या मुलीला शिकवणीत कोठे कमी पडले नाही.

उडाबेकिस्तान येथील तारकंद येथे आशियाई युथ वेटलिफ्टिंग स्पर्धा सुरू आहेत.यामध्ये ५५किलो वजनी गटात सुनील कमलाकर यांची कन्या निक्कीताने ६८ किलो स्नॅक आणि ९५ किलो क्लिन ॲण्ड जर्क असे एकूण १६३ किलो वजन उचलून रौप्यपदक प्राप्त केले. तर क्लीन ॲण्ड जर्कमध्ये सुवर्ण पदक पटकाविले.

मेक्सिको येथे झालेल्या एक महिन्यापूर्वी वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत निकिताने भारताचे प्रतिनिधित्व केले होते. मात्र त्यावेळी पदक हुकले होते.तिला विश्वविजय जीमचे प्रशिक्षक विजय माळी, विश्वनाथ माळी, निशांत पोवार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.निकिताच्या या यशाबद्दल कुरूंदवाड व परिसरातून कौतुक होत आहे.निकिता आशियाई स्पर्धेत पदक मिळविल्याने आमच्या कष्टाचे चिज झाले.तिच्या कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी कशाचीही कमतरता पडू देणार नाही.त्यासाठी आम्हाला कितीही कष्ट सोसावे लागले तरी ती सोसण्याची आमची तयारी आसलेचे निकिताचे वडिल- सुनिल कमलाकर, आजोबा- रावसाहेब कमलाकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

🤙 9921334545