कोल्हापूर : न्यू वाडदे (ता. करवीर) येथील सरपंच सुनीता धडके यांना आर्थिक लाभ घेतल्या प्रकरणी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सरपंच व सदस्य म्हणून यापुढे अपात्र ठरविले आहे.

याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या सुनील धाकू पाटील यांच्या तक्रारी वरून हा निकाल जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिला आहे. दि. १ एप्रिलला सरपंचपदी झालेली निवड अखेर एप्रिल फुल ठरली आहे. तक्रारदार यांच्या तर्फे अँड प्रकाश मुंडे यांनी पाहिले.