मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या घरावर छापा

नवी दिल्ली : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे आणि एनएसईच्या सीईओ चित्रा रामकृष्ण यांच्यावर सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी संजय पांडे यांच्यावर घरावरही छापा टाकला.

फोन टॅपिंगप्रकरणी संजय पांडे आणि चित्रा रामकृष्ण यांच्याविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून आलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

आयसेक सर्व्हिसेस प्रा. लि. ही सॅाफ्टवेअरशी संबंधित कंपनी २००१ मध्ये पांडे यांनी ते सेवेत नसताना स्थापन केली. सेवेत रुजू झाल्यावर पांडे यांनी या कंपनीच्या संचालकपदाचा २००६ मध्ये राजीनामा दिला. या कंपनीत पांडे यांचे कुटुंबीय संचालक आहेत. झावबा कॉर्पवर उपलब्ध माहितीवरून संतोष पांडे हे २००३ पासून या कंपनीचे पूर्णवेळ संचालक आहेत. या कंपनीवर एनएसईने २०१० ते २०१५ या काळात राष्ट्रीय शेअर बाजाराच्या सॉफ्टवेअरसंबंधित लेखापरीक्षणाची जबाबदारी सोपविली होती.