मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांच्या विरोधात शिवडी कोर्टाने जामीनपत्र अटक वॉरंट जारी केलं आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा कुलकर्णी यांनी केलेल्या तक्रारीप्रकरणी कोर्टाकडून वॉरंट जारी करण्यात आलं आहे. या संदर्भात मुंबईतील शिवडी न्यायालयाने जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. येत्या १८ जुलै रोजी हजर राहण्यास सांगितले आहे.

शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने गेल्या महिन्यात राऊत यांच्याविरुद्ध समन्स जारी करून त्यांना ४ जुलै रोजी हजर राहण्यास सांगितले होते. मात्र, सोमवारी न्यायालयात राऊत किंवा त्यांचे वकील हजर नव्हते, असे मेधा सोमय्या यांचे वकील विवेकानंद गुप्ता यांनी सांगितले.
राऊत हजर न राहिल्यामुळे आम्ही त्याच्याविरुद्ध वॉरंट जारी करण्यासाठी अर्ज केला, त्याला न्यायालयाने परवानगी दिली. त्यानंतर न्यायालयाने या प्रकरणाला स्थगिती देत 18 जुलै रोजी सुनावणी ठेवली.
मेधा सोमय्या यांनी गुप्ता आणि लक्ष्मण कनाल या वकिलांच्या मार्फत दाखल केलेल्या तक्रारीत दावा केला आहे होता. “मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या अखत्यारित असलेल्या काही सार्वजनिक शौचालयांच्या बांधकाम आणि देखभालीच्या 100 कोटी रुपयांच्या घोटाळ्यात राऊत आणि त्यांच्या पतीवर आरोप निराधार आणि पूर्णपणे बदनामीकारक आहेत.”, असा आरोप त्यांनी केला होता.