मुंबई : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुजरातमध्ये असलेले शिवसेनेचे अकोल्यातील आमदार नितीन देशमुख यांना हृदयविकाराचा झटका आला आहे.

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे हे पक्षात नाराज आहेत. काल विधान परिषदेच्या मतदानानंतर एकनाथ शिंदे हे विधानभवनातून थेट गुजरातमधील सुरतला गेले आहेत. एकनाथ शिंदे एकटे गेले नसून त्यांच्यासोबत त्यांचे निकटवर्तीय २५ आमदार सुरतमधील एका हॉटेलात थांबले आहेत.
आमदार नितीन देशमुख यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. देशमुख यांच्या तब्येतीच्या तक्रारीनंतर त्यांना सुरतच्या नवीन सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
