नवाब मलिक, अनिल देशमुख यांच्या मतदानाबाबत उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

मुंबई : उच्च न्यायालयानं राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदानाची परवानगी नाकारली आहे. राज्यसभेपाठोपाठ विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीचे दोन आमदार मतदान करू शकणार नाहीत. नवाब मलिक आणि अनिल देशमुख या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार आहेत.

मुंबई उच्च न्यायालयानं नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांचा विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदानाच्या परवानगीसाठीचा अर्ज फेटाळून लावला आहे. केंद्रीय तपास यंत्रणा असलेल्या ईडीनंही नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्या मतदानाला विरोध केला होता. कुठल्याही कैद्याला मतदानाचा अधिकार देता येत नाही. जेव्हा तुम्ही एखाद्या कैदेत असता तेव्हा तुमच्यावर निर्बंध असतात. तुम्हाला सर्वसामान्य नागरिकांसारखे अधिकार राहत नाहीत, असा युक्तिवाद ईडीकडून करण्यात आला. त्यानंतर उच्च न्यायालयानं नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांची याचिका फेटाळत त्यांना परवानगी नाकारली. दरम्यान, नवाब मलिक आणि अनिल देशमुख या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार आहेत.

🤙 9921334545