कॅन्सर बरा होतो, रुग्णांनी उपचारासाठी पुढे येणे आवश्यक- डॉ.अभिजित गणपुले

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कॅन्सर हा आजार बरा होऊ शकतो. मात्र त्यासाठी रुग्णांनी उपचारासाठी पुढे येणे आवश्यक आहे.बरेच रुग्ण उपचार घेण्यास टाळाटाळ करतात घाबरतात मात्र यावर वेळीच उपचार रुग्णांनी करून घेतले तर रुग्ण वाचु शकतो असे प्रतिपादन प्रसिद्ध रोगविकार तज्ञ डॉ.अभिजित गणपुले यांनी केले. कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पुढे बोलताना डॉ. गणपुले म्हणाले कि, कोल्हापूर, रत्नागिरी, सातारा,सांगली व इस्लामपूर याठिकाणी रक्त बदलीचे सर्वाधिक रुग्ण आहेत. आत्तापर्यंत आपल्याकडे आलेल्या ५० पेक्षा जास्त रुग्णांना उपचार करून बरे केले आहे. कॅन्सर बरा होऊ शकतो. यासाठी रुग्णांनी उपचार करून घेण्यासाठी पुढे येणे आवश्यक आहे. जेव्हा शरीरात बरीच असामान्य पांढर्‍या रक्त पेशी तयार होतात. आणि अस्थिमज्जाच्या लाल रक्तपेशी आणि प्लेटलेट्स बनविण्याच्या क्षमतेत हस्तक्षेप करतात तेव्हा हा कर्करोग उद्भवतो. रक्त हा शरीरातील सर्वात कार्यक्षम घटक, रक्तवाहिन्या या शरीरातील वाहतूक यंत्रणाच असते. रक्ताचा कॅन्सर सर्व वयातील व्यक्तींना होतो. पण लहान मुलांमध्ये याचे प्रमाण अधिक आढळते. यात रक्तातील पांढर्‍या पेशींच्या निर्मितीमध्ये दोष निर्माण होतो. अनुवंशिकता, किरणोत्सार, रासायनिक औषधे व विषाणू ही त्याची कारणे आढळतात.रक्ताचा कॅन्सर कुठल्याही वयात होऊ शकतो. लहान मुलांमध्ये त्याचे प्रमाण जास्त आहे. ताप येणे, वारंवार सर्दी, खोकला होणे, नाकातून रक्तस्त्राव होणे, किरकोळ जखमांमधून दीर्घकाळ रक्तस्त्राव होणे, सांधे दुखणे, किरकोळ मार लागल्यावर रक्त गोठणे, सूज येणे, अशक्तपणा येणे, रक्त कमी होणे, भूक मंदावणे, यकृतावर सूज येणे, हाडांना वेदना होणे, लसिका ग्रंथींना सूज येणे ही लक्षणे आढळतात. काही रुग्णांमध्ये डोकेदुखी, उलट्या होणे, चेहरा वाकडा होणे असेही त्रास आढळतात.

रक्ताच्या तपासणीत पांढर्‍या पेशींची संख्या कमी किंवा अधिक आढळल्यास याचे निदान करता येते. कमरेच्या हाडातून मगज काढून त्याची तपासणी करण्यात येते. लहान मुलांना रक्ताचा कॅन्सर पूर्णपणे बरा होऊ शतो. अलीकडच्या काळातील विविध संशोधनांमुळे रक्ताच्या कॅन्सरवरील उपचार यशस्वी होऊ शकतात. या रुग्णांचा दृढ निश्चय व सहनशीलता महत्त्वाची असते. या उपचारात रुग्णांना भरपूर पोषक आहार द्यावा लागतो असेही डॉ. अभिजित गणपुले यावेळी म्हणाले.

यावेळी बोलताना डॉ.गौतमी गणपुले म्हणाल्या, कॅन्सर मधून बऱ्या झालेल्या रुग्णांनी आता या आजाराबाबत प्रबोधन करीत ती आपली जबाबदारी असल्याचे सांगितले. दरम्यान, रुणांनी आपले अनुभव सांगितले.डॉ.अभिजित गणपुले हे २०१५ सालापासून हिमाटोलॉजी रक्त आणि रक्तातील विकार म्हणजेच रक्ताचे रुग्ण यांच्यावर राजारामपुरी येथे त्यांच्या निश हॉस्पिटलमध्ये सेवा देत आहेत. या पत्रकार परिषदेस डॉ. प्रकाश गणपुले, अनघा गणपुले आदी उपस्थित होते.

🤙 9921334545