दोनवडे : कुंभी-कासारी प्रतिष्ठान नेमबाजी केंद्रातील तीन खेळांडूनी राज्यस्तरीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केल्याने त्यांची राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेकरीता निवड झाली आहे.

मुंबई येथे नुकत्याच झालेल्या कॅप्टन ईजिकल राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेमध्ये कुंभी-कासारी प्रतिष्ठान नेमबाजी केंद्रातील ऋषिकेश हंबीरराव बंगे (खुपिरे), पियुष बाळासाहेब पाटील (खाटांगळे) व सलोनी प्रदीप विभुते यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. त्यामुळे त्यांची जी. व्हीं. मालवणकर राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेकरीता निवड झाली आहे. त्यांना माजी आमदार चंद्रदीप नरके व प्रशिक्षक युवराज चौगले यांचे मार्गदर्शन लाभले.