भादोले प्रो कबड्डी स्पर्धेत चव्हाण वारियर्स, शिवाजी माने फायटर्स विजेता

पेठवडगाव (प्रतिनिधी) : भादोले येथे जिजाऊ स्पोर्ट्स व क्रांती तरुण मंडळ भादोले यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या मॅटवरील प्रो कबड्डी स्पर्धेत महिला गटात चव्हाण वारियर्स व पुरुष गटात शिवाजी माने फायटर्स विजेता ठरला.

 या स्पर्धेत चव्हाण वारियर्स, शिवाजी माने फायटर्स, गणेश आडविलकर रायडर्स, संतोष पाटील चंपियन, नागेश पाटील सुपर किंग, कुमार पाटील पॅंथर, संदीप पाटील 7 स्टार, बाळू पाटील अशा संघामधून खेळाडूंनी खिलाडी वृत्ती वृत्तीने खेळ दाखवून रसिकांची मनं जिंकली.

सर्व संघ मालकांच्या के डी सी बँक संचालक विजयसिंह माने, दलितमित्र अशोकराव माने, माजी जि. प. सदस्य विजय बोरगे, किशोर जामदार, सरपंच आनंदराव कोळी, सेवानिवृत्त ग्रामसेवक विखे पाटील आदींच्या उपस्थितीत बक्षीस वितरण झाले.

       महिला गटातील अंतिम सामना चव्हाण वारियर्स व कुमार पाटील पँथर यांच्यात झाला. चव्हाण वारियर्स विजेता ठरला व पुरुष गटात गणेश आडविलकर रायडर्स व शिवाजी माने फायटर्स यांच्यात होऊन शिवाजी माने फायटरस विजेता ठरला. उत्कृष्ट खेळाडू अमर पाटील ठरला.

     या स्पर्धा पार पडण्यासाठी शिवाजी माने, नागेश पाटील, सागर चव्हाण, संतोष पाटील, कुमार पाटील, संदीप पाटील, बाळू पाटील, गणेश आडविलकर, नायकू पाटील, अविनाश पाटील यांनी परिश्रम घेतले. तर सामन्याचे समालोचन दयानंद पाटील यांनी केले तसेच प्रेक्षकांना सामने पाहण्यासाठी बैठक व्यवस्थेसाठी अविनाश संपतराव पाटील यांचे सहकार्य लाभले.

🤙 9921334545