कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक धोंगे यांच्या एकतर्फी कार्यमुक्तीबाबत बुधवार १५ जून रोजी उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. धोंगे यांची ८ मार्चला एकतर्फी कार्यमुक्ती करण्यात आली होती. त्या आदेशाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती.
जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत धोंगे यांच्या कार्यमुक्तीवरून मोठा गदारोळ झाला होता. धोंगे यांच्या जागी तात्काळ अमित पाथरवट यांच्याकडे कार्यभार देण्यात आला होता. मात्र, धोंगे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्याने त्यांच्या कार्यमुक्तीला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. त्यामुळे पूर्ववत कार्यभार धोंगे यांच्याकडेच आहे. धोंगे यांना कार्यमुक्त करण्यासाठी सभागृहात आकांड तांडव करणाऱ्या तत्कालीन तिघा जिल्हा परिषद सदस्यांचा हिरमोड झाला आहे.