उंचगाव : राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून उमेदवारी मिळालेले शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांचा विजय सुकर होऊ दे.. यानिमित्ताने कोल्हापरातून शिवसेनेचा आणखी एक खासदार दिल्लीत पोहचून, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे हात बळकट होऊ दे.. असे साकडे आज करवीर शिवसेनेच्यावतीने उचगावचे ग्रामदैवत श्रीमंगेश्वर चरणी घातले. यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांकडुन अभिषेक करण्यात आला.
शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या सारखे एक लढवय्या आणि तीन वेळा नगरसेवक असलेल्या शिवसैनिकाला शिवसेनेकडून अनपेक्षितपणे थेट खासदारकीची उमेदवारी दिल्याने, जिल्ह्यात शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.नगरसेवकांपासून थेट खासदारकी मिळवणारे संजय पवार हे जिल्ह्यातील पहिलेच खासदार ठरणार आहेत. सहाव्या जागेसाठी होणाऱ्या या निवडणुकीत भाजपकडून प्रतिस्पर्धी उमेदवार उभा केला आहे .त्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची बनली असली तरी शिवसेना नेत्यांकडुन संजय पवार यांच्या विजयाची खात्री देण्यात येत आहे. त्यामुळे शिवसेनेला यात निश्चितच यश मिळेल. तसेच श्रीमंगेश्वराचा आशिर्वादरूपी विजयाचा प्रसाद मिळेल अशी भावना राजू यादव यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव, उपतालुकाप्रमुख पोपट दांगट, विभागप्रमुख दिपक रेडेकर, युवासेना उपजिल्हाप्रमुख विनायक जाधव, ग्रा. पं. सदस्य महेश खांडेकर,अरविंद शिंदे,विजय गुळवे, पै.बाबुराव पाटील, संदीप वाईंगडे, बाळासाहेब नलवडे, योगेश लोहार, बंडा पाटील, विशाल हांगीरकर,पुजारी काशीनाथ वळकुंजे आदी उपस्थित होते.