जयसिंगपुरातील एकाच कुटुंबातील पाचजण जागीच ठार


कासेगाव : पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गवर कासेगावजवळ कार व कंटनेरच्या धडकेत जयसिंगपुरातील एकाच कुटुंबातील पाच जण जागीच ठार झाले. हा अपघात आज, शनिवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास झाला. एकाच कुटुंबातील पाच ठार झाल्याने जयसिंगपूर परिसरावर शोककळा पसरली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, पिंपरी- चिंचवडहून कारने शिरोटे कुटुंबिय जयसिंगपूरकडे चालले होते. वाळवा तालुक्यातील कासेगावजवळील येवलेवाडी फाट्यावर कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे रस्त्याकडेला थांबलेल्या कंटेनरला कारने पाठीमागून जोराची धडक दिली. यात कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघात एवढा भीषण होता की कारचा अक्षरशा चुरडा झाला. अपघातातील सर्व मृत कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथील एकाच कुटुंबातील आहेत. अरिंजय आण्णासो शिरोटे (वय ३५), स्मिता अभिनंदन शिरोटे (वय ३८), पूर्वा अभिनंदन शिरोटे (वय१४), सुनिशा अभिनंदन शिरोटे (वय ९), विरेन अभिनंदन शिरोटे (वय ४) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत.

🤙 9921334545