कोल्हापूर : राज्यातील २५ जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत २८४ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूक २०२२ प्रभागाच्या भौगोलिक सीमा निश्चित करण्याचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. विभागीय आयुक्त कार्यालय पुणे यांनी जिल्ह्यातील जिल्हा परिषद निवडणूक विभाग व पंचायत समिती निर्वाचक गणाच्या प्रारूप प्रभाग रचना प्रस्तावास मान्यता दिली आहे.
प्रारूप प्रभाग रचनेची अधिसूचना प्रसिद्ध करण्याचा दि. २ जून २०२२ असून प्रारूप प्रभाग रचनेवर जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्याकडे हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी २ ते ८ जून २०२२ असा आहे. हरकती जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर, छत्रपती शिवाजी सभागृह येथे कार्यालयीन वेळेत स्विकारल्या जातील, अशी माहिती नोडल अधिकारी जिल्हा परिषद पंचायत तथा उपजिल्हाधिकारी (महसूल) यांनी कळविले आहे.