महेंद्रसिंग धोनीविरोधात खटला!

पाटणा : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्यासह आठजणांविरोधात बेगुसराय न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे. चेक बाऊन्सप्रकरणी एस. के. एंटरप्राइजेसचे मालक नीरज कुमार यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी धोनी आणि इतरांविरुद्ध न्यायालयात खटला दाखल केला आहे.

न्यू उपज वर्धक इंडिया लिमिटेड या खत निर्मिती करणाऱ्या कंपनीसोबत नीरज कुमार यांच्या एस. के. एंटरप्राइजेसने करार केला होता. त्यानुसार त्यांनी ३० लाखांचे खत विक्रीसाठी खरेदी केले. मात्र कंपनीने खत विक्रीसाठी कोणतेही सहकार्य केले नाही. परिणामी खत शिल्लक राहिले. या खताची जाहिरात महेंद्रसिंग धोनी करत होता. नंतर त्यांनी खत कंपनीला परत केले. त्या बदल्यात कंपनीने ३० लाखांचा धनादेश दिला. परंतु तो वटलाच नाही. त्यामुळे त्यांनी कंपनीला नोटीस पाठवली. तिलाही कंपनीने उत्तर दिले नाही. म्हणून त्यांनी कंपनी आणि धोनीसह आठजणांविरोधात तक्रार नोंदवली होती. त्यावरून पोलिसांनी न्यायालयात खटला केला. बेगुसराय न्यायालयाच्या न्यायदंडाधिकारी रुपमा कुमारी यांच्या न्यायालयात २८ जूनला त्यावर सुनावणी होणार आहे.

🤙 9921334545