राधानगरी : राधानगरी तालुक्यातील सरवडे बाजारपेठेतील पांडुरंग संपत्ती पोवार यांचे चप्पलचे दुकान शॉर्ट सर्किटने आग लागून भस्मसात झाले. यात फार मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही.
सरवडे गावचा शुक्रवारी बाजार असतो आज बाजारचा दिवस असताना अचानक दुकानांमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली. बघता बघता आगीने रौद्र रूप धारण केले. ग्रामस्थांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पाणी मारुन आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यश आले नाही. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून बिद्री साखर कारखान्याच्या अग्निशामक बंबांना पाचारण करण्यात आले. यावेळी या अग्निशामक बंबांच्या टीमकडून घटनास्थळी तात्काळ येऊन ही आग विझवली तोपर्यंत पोवार यांच्या या दुकानाचे मोठे नुकसान झाले होते .या आगीमध्ये पोवार यांचे 20 ते 25 लाखाचे नुकसान झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.