मुंबई : शिवसेनेनं दिलेला प्रस्ताव नाकारल्यांनंतर राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संभाजीराजे छत्रपती अपक्ष म्ह्णून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. त्यामुळे संभाजीराजेंचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. त्याच दरम्यान आज संभाजीराजे छत्रपती यांनी एक सूचक ट्विट केलं आहे.
संभाजीराजे छत्रपती यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करतानाचा फोटो शेयर करत लिहिलं की, “महाराज… तुमच्या नजरेतलं स्वराज्य मला घडवायचंय… मी कटीबद्ध असेन तो तुमच्या विचारांशी… मी बांधील असेन तो फक्त जनतेशी…” असं ट्वीट संभाजीराजेंनी केलं आहे.
राज्यसभेच्या सहाव्या जागेवर संभाजीराजे यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आणि सर्वपक्षीय आमदारांनी आपल्याला पाठिंबा द्यावा असं पत्रही त्यांनी लिहिलं. त्यानंतर शिवसेनेकडूनही संभाजीराजेंना ऑफर देण्यात आली. मात्र, संभाजीराजेंकडून शिवसेनेच्या ऑफरवर प्रतिक्रिया न आल्याने शिवसेनेने कोल्हापूरचे जिल्हा प्रमुख संजय पवार यांना सहाव्या जागेवरुन उमेदवारी देण्याचं ठरवलं. त्यामुळे संभाजीराजेंचे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्याच दरम्यान आज संभाजीराजे छत्रपती यांनी हे सूचक ट्विट केलं आहे.