मुंबई : राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. नवाब मलिक यांचे डी गँगशी संबंध असल्याचं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं असल्याची माहिती समोर येत आहे. नवाब मलिक यांच्याविरोधात ईडीने न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं होतं. गोवावाला कंपाउंडसाठी मलिक यांनी कट रचल्याचं ईडीने म्हटलं आहे. तसंच नवाब मलिक आणि हसीना पारकर यांच्यात अनेक बैठका झाल्याचं आणि मनी लाँड्रिंग केल्याचं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं आहे.

मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात ईडीनं चार्जशीट दाखल केली होती. गोवावाला कंपाऊंड मिळवण्यासाठी कट रचल्याचा ठपका ईडीनं नवाब मलिकांवर ठेवलाय. मंत्री नवाब मलिक यांनी हसीना पारकरसोबत वारंवार बैठका घेतल्या आणि मनी लॉड्रिंग केलं, असं प्राथमिक निरीक्षण कोर्टानं नोंदवलं आहे. रोकडे यांच्या खंडपिठानं हे निरीक्षण नोंदवलं आहे. नवाब मलिक यांचा दाऊदच्या गँगमधील लोकांसोबत संबंध असल्याचं निरीक्षण नोंदवलं गेल्यानं आता त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची दाट शक्यता आहे.हसीना पारकर, सरदार शाहवली खान यांच्यासोबत नवाब मलिक यांच्या बैठका झाल्या असल्याचा ठपका ईडीनं नवाब मलिक यांच्यावर ठेवलाय. ‘मलिक हे हसीना पारकर, सलीम पटेल, सरदार शहावली खानच्या संपर्कात होते’ असा आरोप करण्यात आलंय. डी गँगशी संबंध ठेवूनच मलिकांनी गोवावाला कंपाऊंडची जागा मिळवल्याचा आरोप नवाब मलिक यांच्यावर आहे.