पी. चिदंबरम यांच्या मुलावर सीबीआयकडून कारवाई

नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचा मुलगा कार्ती चिदंबरम यांच्या ९ ठिकाणांवर सीबीआयने छापे टाकले आहेत. सीबीआयने कार्तीविरोधात नवीन गुन्हा दाखल केला असून  त्याच्यावर २५० चिनी नागरिकांना व्हिसा मिळवून देण्यासाठी ५० लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप आहे.

आयएनएक्स मीडिया प्रकरणातील व्यवहारांच्या तपासादरम्यान सीबीआयला याची माहिती मिळाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी नियमांकडे दुर्लक्ष करून चिनी नागरिकांना व्हिसा मिळवून देण्यात मदत केल्याचा आरोप आहे. पंजाबमध्ये असलेला तलवंडी साबो पॉवर लिमिटेड प्रकल्प सुरू होता, त्यासाठी चिनी कामगारांना व्हिसा देण्यात आला होता.

या कारवाईनंतर कार्ती चिदंबरम यांनी ट्विट केले आहे. ते म्हणाले की, ही कारवाई किती वेळा झाली, मी त्याची मोजणी विसरलो आहे. याची नोंद असावी. सीबीआयने २०१०-२०१४ दरम्यान या प्रकरणी नवीन गुन्हा दाखल केला आहे. त्याच प्रकरणी आजची कारवाई असल्याचे कार्ती यांचे म्हणणे आहे.

🤙 9921334545