कोल्हापूर : इंदिरा IVF च्या कोल्हापूर केंद्राचा चौथा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कोल्हापूर केंद्र २०१८ मध्ये सुरू झाले आणि तेव्हापासून IVF गर्भधारणेचे १५३२ सायकल पूर्ण केले आहेत. केंद्राने वंध्यत्व समस्येने पीड़ित असलेल्या दाम्पत्यांमध्ये आशा आणि आनंद पसरवण्याच्या उद्देशाने कोल्हापूर केंद्रावर IVF उपचार झालेल्या दाम्पत्यांना बाळांसहीत आणि उपचार प्रक्रिया सुरू असलेल्या जोडप्यांसाठी कार्यक्रम करण्यात आला.
याप्रसंगी इंदिरा IVF चे १ लाख यशस्वी गर्भधारणा पूर्ण झाल्याचे देखील पाहायला मिळाले. १० वर्षांच्या कालावधीत हा टप्पा गाठणारी देशातील पहिली इंदिरा IVF सिंगल स्पेशालिटी चेन बनली आहे. वंध्यत्व निवारण या उद्दिष्टाने चालणारी सर्वात मोठी आणि विश्वसनीय IVF संस्था म्हणून इंदिरा IVF भारतातील प्रत्येक कानाकोपऱ्यात वंध्यत्व उपचार उपलब्ध करून देण्यात अभिमान बाळगते. देशभरात १०७ केंद्रांसह इंदिरा IVF आज देशातील सर्वात मोठी IVF चेन आहे.
भारतातील वंध्यत्वाच्या ओझ्याबद्दल तपशीलवार माहिती देताना इंदिरा IVFचे सीईओ आणि सह – संस्थापक डॉ क्षितिज मुर्डिया म्हणाले, डेटा नुसार भारतातील १०-१५ टक्के जोडप्यांना प्रजनन संस्था आहेत आणि सुरुवातीपासूनच इंदिरा IVF या समस्यांवर उपचार करत आहेत. इंदिरा IVF मधील आमचे एक ध्येय म्हणजे जनजागृती करणे आणि वंध्यत्वावरील गैरसमज दूर करणे. अशा समस्यांना लढा देत, आज आम्ही या प्रवासात १ लाख यशस्वी गर्भधारणेचा टप्पा गाठण्यात यशस्वी झालो आहोत. पालकत्वाचा हाच आनंद महाराष्ट्रातील अधिक ठिकाणी पोहचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. कोल्हापूर सेंटरचे प्रमुख IVF तज्ञ डॉक्टर संतोष डाफळे म्हणाले, आम्ही इंदिरा IVF कोल्हापूर २०१८ मध्ये सुरू केले आणि ही एका मोठ्या कारणासाठी सकारात्मक सुरुवात होती. तेव्हापासून अनेक कुटुंबांना त्यांचे पालक बनण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात मदत केल्याबद्दल आम्हाला आनंद होत आहे. आमच्या जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, प्रशिक्षण आणि डॉक्टर, भ्रूणशास्त्रज्ञ आणि सहाय्यक कर्मचारी यांच्या कुशल टीमुळे हे शक्य झाले आहे. इंदिरा IVF कोल्हापूर येथील कर्मचारी वंध्यत्वाचा सामना करत असलेल्या कोणत्याही जोडप्याला मदत करण्यासाठी सक्षम आहे. अत्याधुनिक पायाभूत सुविधांनी सुसज्ज इंदिरा IVF असंख्य जोडप्यांना वंध्यत्वाच्या अनेकदा गुंतागुंतीच्या प्रवासात योग्य मार्गदर्शन करण्यात आणि शेवटी कुटुंब सुरू करण्याचे त्यांचे स्वप्न साकार करण्यात मदत करते.