कोल्हापूर : सामाजिक न्यायमंत्री धनजय मुंडे यांच्या दुसऱ्या पत्नी करुणा शर्मा आता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यांनी शिवशक्ती पक्षाची स्थापना केली आहे. कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक त्या स्वत: लढवणार आहेत तर २०२४ पंचवार्षिक निवडणूक त्या धनजय मुंडे यांच्या विरोधात लढविनर आहेत.
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर केलेल्या आरोपानंतर करुणा शर्मा या चर्चेत आल्या आहेत. कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक लढवणार असल्याची घोषणा त्यांनी एक महिन्यापूर्वी कोल्हापुरात पत्रकार बैठक घेऊन केली होती. त्याप्रमाणे आता त्या स्वत: निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्या म्हणाल्या, माझ्यावर अन्याय झाला तेव्हा कुणीही माझ्या पाठीशी उभारलं नाही. राज्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार फोफावला आहे. यावर कुणीही आवाज उठवत नाही. महाराष्ट्रातल्या महिलांच्या न्याय हक्कासाठी तसेच भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवण्यासाठी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असल्याचे करुणा शर्मा यांनी स्पष्ट केलं आहे.