आजचं राशीभविष्य शनीवार, ५ मार्च २०२२ : आजच्या दिवशी तुमच्या राशी नुसार तुमच्यासाठी कोणकोणत्या चांगल्या गोष्टी येऊ घातल्या आहेत त्यांचे स्वागत करण्यास तयार व्हा आणि ज्या फारशा चांगल्या नाहीत, त्यांचाही स्वीकार करा. आज तुमच्यासाठी काय वाढून ठेवले आहे, ते पाहूया..
मेष:-
जवळचा प्रवास गरजेचा असेल तरच करावा. नवीन मित्र जोडले जातील. काही क्षणिक आनंदाच्या गोष्टी घडतील. ओळखीतून कामे पार पडतील. दिवस आळसात जाईल.
वृषभ:-
ऐषारामाच्या वस्तू खरेदी कराल. मानसिक समाधान शोधाल. व्यापार्यांना चांगला लाभ होईल. कामात स्त्रियांची उत्तम साथ लाभेल. मित्रमंडळी जमवाल.
मिथुन:-
जोडीदाराशी मतभेद संभवतात. क्षुल्लक गोष्टी नजरेआड कराव्यात. घरातील स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्याल. कलेला विशेष प्राविण्य मिळेल. कामाची चोख पावती मिळेल.
दिवस चांगल्या संगतीत जाईल. वडीलधार्यांची उत्तम मदत मिळेल. तुमच्या कामाची प्रशंसा केली जाईल. मुलांचे विचार विरोधी वाटू शकतात. नातेवाईकांच्या समस्या जाणून घ्याल.
सिंह:-
खेळात मन रमून जाईल. मुलांच्या धडपडीकडे लक्ष ठेवावे. रेस, जुगार यांपासून दूर राहावे. विरोधकांच्या कारवाया मावळतील. कामाचे समाधान लाभेल.
कन्या:–
पत्नीची उत्तम साथ लाभेल. भागीदारीत चांगला लाभ होईल. तुमच्या संपर्कातील लोकात वाढ होईल. मुलांशी क्षुल्लक कारणावरून वाद संभवतो.
तूळ:-
भावंडांशी मतभेद संभवतात. हातात नवीन अधिकार येतील. कामातील ऊर्जा वाढेल. घरात नातेवाईक गोळा होतील. मानसिक स्वास्थ जपावे लागेल.
वृश्चिक:-
काही किरकोळ कौटुंबिक प्रश्न सोडवावे लागतील. व्यावसायिक लाभावर लक्ष केंद्रीत करा. कामात क्षुल्लक अडचणी येऊ शकतात. अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न करावा. आप्तेष्टांशी मतभेद संभवतात.
धनू:-
दिवस धावपळीचा राहील. स्वभावात काहीसा हट्टीपणा येईल. क्षुल्लक गोष्टीवरून वाद संभवतात. कौटुंबिक कामात अधिक वेळ जाईल. वरिष्ठ तुमच्यावर खुश होतील.
मकर:-
मनातील निराशा दूर सारावी. कुटुंबात काही बदल घडून येतील. जोडीदाराची बाजू समजून घ्यावी. आर्थिक ताण वाढू शकतो. फसवणुकीपासून सावध राहावे.
कुंभ:
कामातील दिरंगाई टाळण्याचा प्रयत्न करावा. कामाचा ताण जाणवेल. कौटुंबिक प्रगतीकडे लक्ष द्यावे. आवडते पदार्थ खायला मिळतील. इतरांवर आपली उत्तम छाप पडाल.
मीन:-