पुन्हा शेतकरी जन्म नको म्हणत तरूणाची आत्महत्या

पंढरपूर : शेती व शेतकऱ्याच्या आयुष्याला कंटाळलेल्या पंढरपूर तालुक्यातील मगरवाडीतील तरुणाने पुन्हा शेतकरी म्हणून जन्माला येणार नाही ! असा शेवटचा संदेश देत कीटकनाशक पिऊन आत्महत्या केली. आत्महत्येचा व्हिडिओ त्याने व्हायरल केल्याने खळबळ उडाली आहे.

सूरज रामा जाधव (वय २६) असे आत्महत्या केलेल्या तरुण शेतकऱ्याचे नाव असून बुधवारी त्याने विपारी औषध घेतले होते. औषध घेण्यापूर्वी सूरजने आपल्या मोबाइलवर व्हिडिओ काढला आहे. यामध्ये त्याने, शेतकन्याच्या जन्माला आपण कधीच परत येणार नाही, असे म्हटले आहे. सरकार शेतकऱ्याचा कधी विचार करणार नाही, असे म्हणून त्याने विषारी औषधाची बाटली तोंडाला लावल्याचा व्हिडिओ काढला आहे.

दरम्यान या घटनेनंतर ग्रामस्थांनी सूरजला येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. दोन दिवस त्याच्यावर उपचार सुरू होते. परंतु शुक्रवारी त्याची प्राणज्योत मालवली.
या घटनेमुळे ग्रामीण भागातून संताप व्यक्त होत आहे.