कोल्हापूर : सर्वसामान्य भारतीय नागरिकांना पासपोर्ट प्रक्रिया सोपी करून देणारे डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्यावरील ‘पासपोर्ट मॅन ऑफ इंडिया’ माहितीपट लवकरच प्रदर्शन देशातील प्रमुख शहरात होणार आहे.
माजी सनदी अधिकारी आणि कोल्हापूर जिल्ह्याचे सुपुत्र डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी भारतातील पासपोर्ट सेवेत केलेल्या आमुलाग्र बदलावर आधारित “पासपोर्ट मॅन ऑफ इंडिया” या लघुपटाच्या प्रदर्शनाबाबतची माहिती देण्यासाठी आज आयोजित केलेल्या पत्रकार पत्रकार परिषदेत लघुपटाचे दिग्दर्शक धनंजय भावलेकर यांनी दिली.
धनंजय भावलेकर यांनी यापूर्वी डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे यांच्या विदेश सेवेतील पस्तीस वर्षांच्या कारकिर्दीवर आधारित जिप्सी या माहितीपटाचे दिग्दर्शन केले आहे. हा माहितीपट अनेक आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवात गौरवला गेला होता. प्रशासनात काम करणाऱ्या आणि करू इच्छिणाऱ्या प्रत्येक तरुणासाठी हा माहितीपट केवळ प्रेरणा च नाही तर सचोटीने आणि कर्तव्यदक्ष राहत नवीन नवीन काम करण्याची उर्मी देणारा असेल.
डॉ. मुळे यांनी पासपोर्ट विभागातील किचकट प्रक्रिया सोपी करून सर्वसामान्य माणसाला सहज पासपोर्ट उपलब्ध करून देण्याबाबत जे बदल केले त्यावर आधारित “पासपोर्ट मॅन ऑफ इंडिया” हा लघुपट तयार करण्यात आला आल्याचे भावलेकर यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेला ज्ञानेश्वर मुळे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, भारतीय जय संविधान मंचचे पारस ओसवाल उपस्थित होते.