गगन बावडा प्रतिनिधी – दिगंबर म्हाळुंगेकर
गगन बावडा तालुक्यातील अणदूर येथे मा. विलास पाटील साहेब सांस्कृतिक, सामाजिक, आणि कला, क्रीडा फौंडेशन अणदूर यांच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले व गगन बावडा तालुक्यातील व तशेच इतर बाहेर तालुक्यातील युवकांनी उत्स्फूर्त पणे प्रतिसाद दिला.
जवळपास 120 रक्तदात्यांनी रक्तदान करून समाज कार्याचा वारसा जोपासण्याचा प्रयत्न केला रक्त दात्यांना सन्मान पत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले कोरोना महामारीचे संकट जगावरती असताना रक्ताचा तुटवडा व गरज भासत असताना हे ओळखून आज अणदूर येथे रक्तदान शिबीर घेण्यात आले असून ते समाज हिताचे व कौवतुकास्पद आहे यावेळी कोल्हापूर येथील अर्पण ब्लड बँक यांचेकडे केलेले रक्तदान सु्फूर्ध करण्यात आले यावेळी उपस्थित विलास पाटील साहेब फौंडेशन अणदूर चे अध्यक्ष – विठ्ठल पाटील, उपाध्यक्ष – संदीप पाटील, सचिव – संदीप विष्णू पाटील, सुधाकर पाटील, रुपेश सावंत, संकेत पाटील, भीमराव पाटील, रणजीत पाटील, अजित पाटील, उमेश पाटील, शरद पाटील, संदीप पाटील सुरज पाटील, अनिकेत पाटील, भरत पाटील इत्यादी उपस्थित होते.