घुणकी हातकणंगले तालुक्यातील घुणकी येथे सालाबादप्रमाणे विशाल तीर्थ यात्रेचे वारणा नदीच्या काठावरती श्री मंगोबा देवाची यात्रा भरते यावेळी देवाची भाकणूक झाली तेथे गावकऱ्यांच्या वतीने नैवेद्य नारळ देतात.
या दिवशी मंगोबा देवाला या पासून दीड किलोमीटर अंतरावर वारणा नदीच्या काठावर श्री मंगोबा देवाची पालखी व श्री हनुमान देवाची पालखी विराजमान होते या पालखीसोबत देवाचा घोडा असतो यावेळी भंडार्याच्या उधळीत व ढोलाच्या गजरात मोठ्या उत्साहाने पालखी सोहळा चालतो गावातील नागरिक मोठ्या कुतूहलाने सहभागी होतात धनगर समाजाच्या वतीने व अन्य नागरिक पालखीसोबत असतात ही पालखी नदी काठावरून सायंकाळी सात वाजता श्री हनुमान मंदिराच्या जवळ थांबते व रात्री दहा वाजता निघून रात्रभर ढोलाच्या गजरात भंडार्याच्या उधळणीत गावातून मिरवणूक निघून की दुसऱ्या दिवशी सकाळी सहाच्या दरम्यान पालखी देव माळी येथे पोहोचते या गावचे ग्रामदैवत म्हणून आसपासच्या खेड्यामध्ये प्रसिद्ध आहे श्री मंगोबा देवाच्या देवळांत प्रत्येक अमावस्या दिवशी प्रसाद असतो या दिवशी भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी उपस्थित असतात.