कोल्हापूर : या वर्षीच्या युनियन बजेटमध्ये गोल्ड वरील ड्यूटीमधे कुठलाही बदल न केल्याने ज्वेलरी उद्योगाला मोठा दिलासा मिळाला आहे अशी प्रतिक्रिया सोने चांदी कारागीर बहुउद्देशीय असोसिएशनचे अध्यक्ष नचिकेत भुर्के यांनी दिली.
क्रीप्टो करन्सी ट्रॅक्सच्या कक्षेत आणल्याने यामधे जी मोठी गुंतवणूक होत होती त्याला आळा बसुन ही गुंतवणूक सोने चांदी क्षेत्रात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे कारागीरांना सुद्धा काम वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले. इन्कम टॅक्स मधे कुठलाही बदल न केल्याने त्याचा डायरेक्ट फायदा सर्वसामान्य कारागीरांना होणार आहे.
सध्या कोल्हापुरात डायमंड ज्वेलरीचा ट्रेंड वाढत आहे, डायमंड वरील ड्युटी ७.५% वरुन ५% केल्याने या क्षेत्रातील काम वाढुन डायमंड सेक्टरला नवीन झळाळी मिळणार आहे.तसेच मोत्यांवरील ड्युटी १०% वरुन ५% केली आहे.आणखी एक या बजेटचा मोठा फायदा होणार तो म्हणजे सध्या सोनेचे दागिन्यांना र्होडीयम पाॅलिश करण्याची क्रेझ आहे, र्होडीयम मेटल वरील ड्युटी १२.५ वरुन २.५% केल्याने त्याचा फायदा ज्वेलरी क्षेत्रातील कारागीर, ज्वेलर्स या सर्वांनाच होणार आहे.कोरोनामुळे झळाळी कमी झालेल्या ज्वेलरी क्षेत्राला या बजेटमुळे जो बुस्ट मिळणार आहे, त्याचा फायदा ज्वेलर्स बरोबरच या क्षेत्रात काम करणाऱ्या कारागीरांना सुद्धा मोठ्या प्रमाणात मिळणार असल्याचे भुर्के यांनी सांगितले.