मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. त्यातच आता मुंबईतून चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. मुंबईत रविवारी आठ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झालीय.
त्यामुळे मुंबईत कोरोनाचा मोठा विस्फोट होताना दिसत आहे. रविवारी मुंबईत कोरोना व्हायरसचे 8,063 नवीन रुग्ण आढळले, जे शनिवारी झालेल्या संसर्गाच्या प्रकरणांपेक्षा 1,763 अधिक आहेत. अधिका-यांनी सांगितले की शहरात शनिवारी संसर्गाची 6,347 प्रकरणे आणि रविवारी 27 टक्के अधिक प्रकरणे आढळली.
गेल्या 24 तासांत मुंबईत कोरोनाची लागण झालेल्या 578 रुग्णांना उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर सध्या शहरात सक्रिय रुग्णांची संख्या 29,819 आहे. रविवारी आढळलेल्या 89 टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसली नाहीत. देशाच्या आर्थिक राजधानीत एकूण संक्रमित रुग्णांची संख्या आता 7,99,520 झाली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत या आजारामुळे कोणाचाही मृत्यू झाला नाही आहे.