एनआयटीमध्ये सिव्हिल पदवीसह एआय व कम्प्युटरचा शाखाविस्तार

कोल्हापूर: गेल्या चार दशकांहून अधिक काळ दक्षिण महाराष्ट्राच्या तंत्रशिक्षण क्षेत्रात ध्रुवताऱ्याप्रमाणे चमकणाऱ्या ‘न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजी (NIT) कोल्हापूर’ काॅलेजने मोठी झेप घेतली आहे. डिप्लोमा विभागात ‘एआयएमएल’ची १२० वरून १५० आणि ‘इलेक्ट्रॉनिक्स ॲन्ड कम्प्युटर’ची ६० वरून ९० अशा प्रवेश क्षमता वाढीबरोबरच डिग्री विभागात ६० जागांसह सिव्हिल इंजिनिअरिंग ही पाचवी शाखा नव्याने सुरू होत आहे. येथील शैक्षणिक सुविधा व गुणवत्ता, होणारे १००% प्रवेश, ४३ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव पाहून अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (AICTE) यासाठीची अंतिम मान्यता नुकतीच दिल्याची माहिती प्राचार्य डाॅ. संजय दाभोळे यांनी दिली. डिजिटल क्रांती घडवत असलेल्या एआय तंत्रज्ञानाचा वाढता वापर आयटी क्षेत्रात होत असल्याने एआयएमएल इंजिनिअर्सना प्राधान्य दिले जात आहे.

 

 

 

 

 

हार्डवेअर व सॉफ्टवेअरचा सुरेख संगम असलेली इलेक्ट्रॉनिक्स ॲन्ड कम्प्युटर ही शाखा बहुतांश उद्योगांना पुरक आहे. तसेच, देशात वेगाने होत असलेल्या पायाभूत विकासामुळे सिव्हिल इंजिनिअर्सची मागणी वाढली आहे, असेही त्यांनी सांगितले. एनआयटीने गेल्या ४३ वर्षांत ग्रामीण व बहुजनांच्या मुलामुलींना तंत्रशिक्षणाचे दार उघडत सामाजिक बांधिलकी जपणारे जबाबदार इंजिनिअर्स घडवले आहेत. आताची प्रवेश क्षमतावाढ व शाखाविस्तार हे काॅलेजच्या गुणवत्तेवर उमटलेली विश्वासार्हतेची मोहोर आहे. एनबीए मानांकित एनआयटीमध्ये इन्स्टिटय़ूशन्स इनोव्हेशन कौन्सिलच्या माध्यमातून संशोधनास चालना मिळत असल्याने भविष्यात जास्त संख्येने स्टार्टअप निर्माण होतील असा विश्वास श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर संस्थेचे चेअरमन डाॅ. के. जी. पाटील यांनी व्यक्त केला. यावेळी संस्थेच्या संचालिका माजी महापौर सई खराडे, संचालिका सविता पाटील, संचालक पी. सी. पाटील, सेक्रेटरी मेटील उपस्थित होते.

🤙 8080365706