महापौर चषक फुटबॉल स्पर्धेस उत्साहात प्रारंभ पहिला सामना वेताळमाळ तालीम मंडळ तर दुसरा सामना पाटाकडील तालीम मंडळ यांनी जिंकला

कोल्हापूर  : महापौर चषक फुटबॉल स्पर्धेस आजपासून उत्साहात प्रारंभ करण्यात आला. महापौर सौ.रुपाराणी निकम, आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड, उपमहापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, महिला बालकल्याण समिती सभापती सौ.कौसर बागवान, सभागृह नेता मुरलीधर जाधव, विरोधी पक्षनेता राजेश लाटकर, गटनेता आदिल फरास, इंद्रजित बोंद्रे यांनी फुटबॉलला किक मारुन या स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ व उप-आयुक्त किरणकुमार धनवाडे यांनी यावेळी उपस्थित पदाधिकारी, नगरसेवक यांचे रोपटे देऊन स्वागत केले. या स्पर्धेमध्ये शहर हद्दीतील 16 नामांकित संघानी सहभाग घेतला आहे.

 

 

 

 

 

यावेळी नगरसेवक विजयसिंह खाडे-पाटील, विनायक फाळके, संजय मोहिते, अमर समर्थ, अशकीन आजरेकर, नगरसेविका सौ.नेहा तेंडुलकर, अनुराधा खेडकर, सौ.सृष्टी जाधव, इस्टेट ऑफिसर शेखर साळोखे, नगरसेवक व नगरसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दुपारी 2 वाजता पहिला सामना वेताळमाळ तालीम मंडळ विरुध्द वर्षा विश्वास तरुण मंडळ यांच्यामध्ये खेळविण्यात आला. हा सामना वेताळमाळ तालीम मंडळने 3 विरुध्द 0 गोलने जिंकला. पुर्वार्धात वेताळमाळ तालीम मंडळच्या रोहित देसाई याने 35 व्या मिनिटाला पहिला गोल नोंदविला. त्यानंतर 38 व्या मिनिटाला वेताळ माळच्या प्रणव कणसे याने एक गोल नोंदविला. पुर्वार्धात 2-0 असा सामना राहिला. उत्तरार्धात वेताळमाळ तरुण मंडळच्या आकाश मोरे याने 80 व्या मिनिटास एक गोल नोंदवून संघास 3-0 अशी आघाडी मिळवून दिली. सामना संपेपर्यंत हिच आघाडी कायम राहिल्याने वेताळमाळ तालीम मंडळ ने हा सामना 3 विरुध्द 0 गोलने जिंकला.

दुपारी 4 वाजता दुसरा सामना पाटाकडील तालीम मंडळ विरुध्द सुभाषनगर फुटबॉल क्लब यांच्यामध्ये खेळविण्यात आला. हा सामना पाटाकडील तालीम मंडळने 8 विरुध्द 3 गोलने जिंकला. पुर्वार्धात पाटाकडील तालीम मंडळच्या रोहित पवार याने 8 व्या व 15 व्या मिनिटाला असे 2 गोल नोंदविले. 32 व्या मिनिटाला ओंकार मोरे याने 3 रा गोल नोंदविला. पुर्वार्धात हा सामना 3-0 अशी आघाडी राहिली. उत्तरार्धात पाटाकडील तालीम मंडळाच्या ओंकार मोरे याने एक गोल नोंदविला. तर 47 व्या मिनिटाला ऋषीकेष मेथे-पाटील याने हेडद्वारे 1 गोल नोंदविला. यानंतर 53 व्या मिनिटाला ओंकार मोरे याने 6 वा गोल नोंदविला. 61 व्या मिनिटाला ऋषीकेष मेथे-पाटील याने 7 वा गोल नोंदविला तर 67 व्या मिनिटाला अरबाज पेंढारी याने 8 वा गोल नोंदविला. उर्त्तार्धात सुभाषनगर फुटबॉल क्लबने 56 व्या मिनिटाला नितीन पोवार याने गोल नोंदविला तर 68 व 73 व्या मिनिटाला आर्यन पांढरे याने 2 गोल नोंदविले. सामना संपेपर्यंत पाटाकडील तालीम मंडळाची 8 विरुध्द 3 अशी आघाडी राहिली. सामना संपेपर्यंत हिच आघाडी कायम राहिल्याने पाटाकडील तालीम मंडळाने हा सामना 8 विरुध्द 3 गोलने जिंकला.

फुटबॉल स्पर्धेच्या ठिकाणी सिक्युरिटीसाठी महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडील कर्मचारी, प्रथोमोपचार व्यवस्थेसाठी महापालिका आरोग्य विभागाकडील ऍ़म्ब्युलन्स व फिजोओथेरपीस्ट उपलब्ध केले आहेत.

बुधवार दि.6 मे रोजी दुपारी 2.00 वाजता दिलबहार तालीम विरुध्द संध्यामठ तरुण मंडळ, दुपारी 4.00 वाजता श्री शिवाजी तरुण मंडळ विरुध्द रंकाळा तालीम मंडळ असे एकूण दोन सामने खेळविण्यात येणार आहे.

0000000000000

🤙 8080365706