कोल्हापूर :गडहिंग्लज शहरातील संघर्ष ग्रुप यांच्या वतीने आयोजित शिवजयंती निमित्त निघालेल्या मिरवणुकीचे उद्घाटन मंत्री हसन मुश्रीफ यांनीकेले.

यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची पूजन करून मिरवणुकीस सुरुवात झाली.
यावेळी देवमाणूस फेम अस्मिता देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील – आसुर्लेकर, नगराध्यक्ष महेश तुरबतमठ, उपनगराध्यक्ष महेश सलवादे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील – गिजवणेकर, यांच्यासह आजी-माजी नगरसेवक व गडहिंग्लज शहरातील प्रमुख कार्यकर्ते माता-भगिनी व संघर्ष ग्रुपचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
