मुंबई : प्रवाशांच्या वाढत्या गर्दीमुळे कोल्हापूर- तिरुपतीच्या हरिप्रिया एक्स्प्रेस मधील सीट्स किंवा डबे वाढविण्याची मागणी सातत्याने होत आहे. परंतु, ऑक्टोबर २०२५ पासून रेल्वे प्रशासनाने हरिप्रिया एक्सप्रेसच्या डब्यांच्या संख्येत आणि प्रकारात बदल केले आहेत. सामान्य प्रवाशांच्या सोयीसाठी असलेल्या ३ स्लीपर डब्यांची कपात केल्यामुळे सामान्य प्रवाशांचे सुमारे २२५ बर्थ कमी झाले आहेत.


यामुळे प्रवाशांची अत्यंत गैरसोय होत असून, याप्रकरणी गांभीर्याने लक्ष घालून कोल्हापूर – तिरुपती (हरिप्रिया एक्स्प्रेस – ट्रेन क्र. १७४१६/१७४१५) मधील कपात केलेल्या ३ स्लीपर कोच डब्यांची संख्या पूर्ववत करून बर्थची संख्या वाढवावी आणि आगाऊ आरक्षण कालावधीतील १८० सीट्स बुकिंगची संख्या पूर्ववत करणेबाबत आपल्या स्तरावरून संबधितांना आवश्यक सूचना द्याव्यात, अशी मागणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी शिवसेना पक्षाचे संसदीय गटनेते खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.

या निवेदनात पुढे म्हंटले आहे कि, कोल्हापूर व आसपासच्या जिल्ह्यातून तसेच सीमाभागातील आंध्रप्रदेश येथील श्री तिरुपती बालाजी येथे जाणाऱ्या भाविकांसाठी कोल्हापूर रेल्वेस्टेशन येथून हरिप्रिया एक्स्प्रेस (ट्रेन क्र. १७४१६/१७४१५) उपलब्ध आहे. ही दक्षिण मध्य रेल्वेद्वारे चालवली जाणारी एक महत्त्वाची एक्सप्रेस रेल्वे आहे. ही ट्रेन महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि आंध्र प्रदेशातील तिरुपती या दोन धार्मिक शहरांना जोडते. या रेल्वेच्या माध्यमातून दररोज हजारो भाविक कोल्हापूरहून तिरुपती कडे रवाना होतात. प्रवाशांच्या वाढत्या गर्दीमुळे सीट्स किंवा डबे वाढविण्याची मागणी सातत्याने होत आहे. परंतु, ऑक्टोबर २०२५ पासून रेल्वे प्रशासनाने हरिप्रिया एक्सप्रेसच्या डब्यांच्या संख्येत आणि प्रकारात बदल केले आहेत. सामान्य प्रवाशांच्या सोयीसाठी असलेल्या ३ स्लीपर डब्यांची कपात केल्यामुळे सामान्य प्रवाशांचे सुमारे २२५ बर्थ कमी झाले आहेत. यासह आगाऊ आरक्षण कालावधीत पूर्वी सुमारे १८० सीट्सचा बुकिंगची संख्या कमी करून ती १०५ इतकी करण्यात आली आहे. यामुळे भाविकांच्यात नाराजीचा सूर उमटत आहे. कोल्हापूर आणि कर्नाटक राज्यातील रेल्वे प्रवासी संघटनांनी स्लीपर डब्यांची संख्या पुन्हा वाढवण्याची किंवा जादा स्लीपर डबे जोडण्याची मागणी केली आहे, जेणेकरून सर्वसामान्य प्रवाशांना परवडणाऱ्या दरात प्रवास करता येईल. सबब, याप्रकरणी आपण गांभीर्याने लक्ष घालून कोल्हापूर – तिरुपती (हरिप्रिया एक्स्प्रेस – ट्रेन क्र. १७४१६/१७४१५) मधील कपात केलेल्या ३ स्लीपर कोच डब्यांची संख्या पूर्ववत करून बर्थची संख्या वाढविणेबाबत आणि आगाऊ आरक्षण कालावधीतील १८० सीट्स बुकिंगची संख्या पूर्ववत करणेबाबत आपल्या स्तरावरून संबधितांना आवश्यक सूचना द्याव्यात, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
