सकारात्मकता आणि विश्वास हीच यशाची गुरुकिल्ली- डॉ. ज्ञानवत्सल स्वामी -डी. वाय. पाटील विद्यापीठाचा १४ वा दीक्षांत समारंभ उत्साहात -७४१ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान

कोल्हापूर:पैसा मिळवण्यापेक्षा माणसे जोडणे हे सर्वात मोठे कौशल्य आहे. सकारात्मकता आणि मी करू शकतो हि भावना तुम्हाला यशाच्या मार्गावर नेईल. त्यासाठी नैतिकता पाळून कुटुंब व समाजासाठी कार्यरत रहा, असे आवाहन जागतिक कीर्तीचे लाईफ कोच आणि बी.ए.पी.एस. स्वामीनारायण संस्थेचे डॉ. ज्ञानवत्सल स्वामी यांनी केले. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या १४ व्या दीक्षांत समारंभात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी ७४१ विद्यार्थ्यांना पदवी, पदव्युत्तर पदवी व डॉक्टरेटने सन्मानित करण्यात आले.

 

डी.वाय.पाटील हॉस्पिटलच्या आवारात भव्य शोभायात्रेने दीक्षांत समारंभाला प्रारंभ झाला कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभाला दत्ता मेघे विद्यापीठचे प्र- कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा, विश्वस्त आणि डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे प्र कुलपती ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, विश्वस्त तेजस पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, कुलसचिव डॉ. विश्वनाथ भोसले, परीक्षा नियंत्रक अभय जोशी आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी बोलताना स्वामीजी म्हणाले, माजी राज्यपाल डॉ. डी वाय पाटील यांच्या भेटीवेळी त्यांच्याकडून मिळालेला पॉझिटिव्हिटी आणि आपल्या गुरु महंत स्वामी महाराज यांनी सांगितलेला ‘आय कॅन’ हा मात्र या दोन्हीची सांगड घातली तर समाधानी आणि यशस्वी आयुष्य जगात येईल. भारत हा तरुणांचा देश आहे. अमेरिकेतील सर्व अभ्यासक्रमाचे पदवीधरापेक्षा आपल्या देशातील अभियंत्यांची संख्या जास्त आहे. भारत हे टेक्नोलॉजीमधील जगाचे भविष्य आहे. आजचे युग हे तंत्रज्ञान आणि मोबाईलचे आहे. याचा वापर हा करावाच लागेल मात्र त्यावर नियत्रण हवे आणि कामापुरताच उपयोग करावा.

आयुष्यात माणसे कमवायला शिका. आपल्या कुटुंबाला वेळ अधिकाधिक वेळ द्या. जगण्यात नीतिमत्तेला महत्त्व द्या. त्याचबरोबर आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो हे विसरू नका. कोणाच्या तरी चेहऱ्यावरचा आनंद होण्याचा प्रयत्न करा, तरच एक समाधानी आयुष्य जगता येईल असा कानमंत्र त्यांनी यावेळी दिला.

कुलपती डॉ. संजय डी पाटील म्हणाले, विद्यार्थी आणि पालकांनी आपल्या विद्यापीठाची निवड करून योग्य निर्णय घेतल आहे. शिक्षणाचा उपयोग देश सेवा आणि समाजाच्या प्रगतीसाठी करा. व्यवसायिक आयुष्यात नेहमी नैतिकता, प्रामाणिकपणा आणि सचोटी जपा. सतत शिकत रहा आणि कठोर परिश्रम चिकाटीच्या जोरावर यश प्राप्त करा.

कुलगरू डॉ. राकेश कुमार शर्मा यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली. त्यांनी यावेळी विद्यापीठाच्या प्रगतीचा आढावा मांडला. विद्यापीठ व प्राध्यापकांना मिळालेले विविध पुरस्कार, यश याबाबतची माहिती देऊन पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.

या समारंभास सौ. शांतादेवी डी पाटील, डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ए. के. गुप्ता, डी. वाय. पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीचे कुलगुरु डॉ. मनिष भल्ला, डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी आंबीचे कुलगुरु डॉ. शिरीष पाटील, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. बी. पी. साबळे, मुबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. संजय देशमुख, शिवाजी विद्यापीठ माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळोखे, सौ. पूजा ऋतुराज पाटील, सौ. वृषाली पृथ्वीराज पाटील, देवश्री सतेज पाटील, अजित पाटील बेनाडीकर, सीएचआरओ श्रीलेखा साटम, रिसर्च डायरेक्टर डॉ. पी. एस. पाटील, आयक्यूएसी संचालक डॉ. शिंपा शर्मा, मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. राजेश ख्यालप्पा, प्राचार्य डॉ. उमाराणी जे., डॉ. सी. डी. लोखंडे, डॉ. चंद्रप्रभू जंगमे, डॉ. अमृतकुंवर रायजादे, रुधिर बारदेस्कर, डॉ. आर. एस. पाटील, प्रा. डॉ. अजित पाटील, वैदयकीय अधीक्षक डॉ. वैशाली गायकवाड, डॉ. पद्मजा देसाई यांच्यासह विविध संस्थांचे प्राचार्य, प्राध्यापक, पदवीप्राप्त विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राष्ट्र उभारणीमध्ये मोठे योगदान
डी वाय पाटील अभिमत विद्यापीठात जागतिक दर्जाचे शिक्षण दिले जाते. येथे मूल्य, नैतिकता, समाजभान यांचे धडे दिले जातात. या माध्यमातून राष्ट्र उभारणीमध्ये डी वाय पाटील विद्यापीठ आणि पाटील कुटुंबीय महत्त्वाचे योगदान देत असल्याचे प्रतिपादन डॉ. स्वामी यांनी केले

🤙 8080365706