कोल्हापूर :शेतकरी आणि नागरिकांसाठी भागीरथी महिला संस्थेच्यावतीनं मोफत झुणका भाकरीचं वाटप करण्यात आलं. जिल्हयाच्या कानाकोपर्यातून येणार्या शेतकर्यांना प्रदर्शनात कृषी विषयक तंत्रज्ञान आणि नवनवीन माहिती तर मिळतेच. शिवाय शेतकर्यांना झुणका भाकरी मोफत मिळत असल्यानं, अनेकांनी समाधान व्यक्त केलं. सुमारे ५ हजार शेतकर्यांनी झुणका-भाकरीचा लाभ घेतला.
पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठं कृषी प्रदर्शन म्हणून भिमा कृषी प्रदर्शनाकडं पाहिलं जातं. कृषी तंत्रज्ञान, नवनवीन औजारं, पशूपक्षी, जनावरं यामुळं हे प्रदर्शन शेतकर्यांसाठी उपयुक्त ठरतंय. प्रदर्शन पाहण्यासाठी येणार्या शेतकरी आणि नागरिकांसाठी भागीरथी महिला संस्थेच्यावतीनं, प्रदर्शनकाळात दरवर्षी मोफत झुणका भाकरी वाटप करण्यात येतं. आज दुपारी भुदरगड तालुक्यातील म्हसवे इथल्या नवज्योत महिला बचत गटाच्यावतीनं झुणका-भाकरीचं वाटप करण्यात आलं. भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरूंधती महाडिक, मंगलताई महाडिक, शकुंतला महाडिक, साधना महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत हे वाटप करण्यात आलं. त्याचा शेतकरी बांधव, विद्यार्थी आणि नागरिकांनी येथेच्छ आस्वाद घेतला. सुमारे ५ हजार शेतकर्यांनी झुणका भाकरीचा आस्वाद घेतला. जिल्हयाच्या कानाकोपर्यातून येणार्या शेतकर्यांना प्रदर्शनात नवनवीन माहिती तर मिळतेच. शिवाय शेतकर्यांना झुणका भाकरी मोफत मिळत असल्यानं अनेकांनी समाधान व्यक्त केलं.
