मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली आंबा येथे आरोग्यकेंद्राला भेट

कोल्हापूर:तालुका शाहूवाडी, जिल्हा कोल्हापूर येथील आंबा गावातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राला आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी भेट दिली. या केंद्राद्वारे नागरिकांना दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवांची पाहणी केली आणि अधिकाऱ्यांशी संवाद साधला.

येथील काम अपेक्षेप्रमाणे नसल्याने कामकाजाबाबत असमाधान व्यक्त केले. तसेच हे केंद्र ग्रामीण आणि दुर्गम भागातील लोकांसाठी आधार असल्याने कामात कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा चालणार नाही, असे स्पष्ट करत तातडीने सुधारणा करण्याची सूचना मंत्री आबिटकर यांनी केली.

 

🤙 8080365706