कोल्हापूर:कोल्हापर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राधानगरी तालुका काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकारऱ्यांची बैठक आमदार जयंत आसगावकर आणि आ . सतेज पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक ए. वाय. पाटील उपस्थित होते.
लोकांच्या मनात काँग्रेस असल्याचं पुन्हा सिद्ध झाले आहे. आता कार्यकर्ता म्हणून लोकांपर्यंत फक्त पोहोचावं लागेल. स्वर्गीय श्रीपतरावदादा बोंद्रे आणि पी. एन. साहेबांनी राखलेला राधानगरी काँग्रेसचा गड सर्व उमेदवार निवडून देऊन अभेद्य राखूया असे आवाहन आ . सतेज पाटील यांनी उपस्थितांना केले.
यावेळी हिंदुराव चौगले, सदाशिव चरापले, पी.डी. धुंदरे, एम. आर. पाटील, उदय पाटील- सडोलीकर, डी. डी. चौगले, कृष्णराव पाटील, विश्वनाख पाटील, रवींद्र पाटील, ॲड. तौफिक मुलाणी, बाबासाहेब चौगले, अविनाश पाटील, बंडोपंत वाडकर यांच्यासह अभिजीत तायशेटे, मोहन डोंगळे, मोहन धुंदरे, बाजीराव चौगले, मोहन पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
