कोल्हापूर:करवीर विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर इच्छुकांच्या मुलाखती आणि प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आदरणीय खासदार शाहू छत्रपती महाराज, आमदार जयंत आसगावकर आणि आ . सतेज पाटील यांच्या उपस्थितीत काँग्रेस कमीटी येथे पार पडली.
यावेळी, सर्व राजकीय समीकरणे विरोधात असतानाही कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत आम्ही एकाकीपणे लढलो आणि जनतेने भरघोस यश दिले. या विजयानंतर मिळालेला पाठिंबा, शुभेच्छा आणि ऊर्जा घेऊन आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका आम्ही अधिक ताकदीने लढवणार आहोत असा आत्मविश्वास आ.सतेज पाटील यांनी उपस्थितांना दिला.
यावेळी राजेश लाटकर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, गोकुळचे संचालक बाबासो चौगले, चेतन नरके, श्रीमती उदयानी साळुंखे वहिनी, बबनराव रानगे, रामकृष्ण पाटील, अमर पाटील, रसिका पाटील, महेश पाटील यांच्यासह करवीर विधानसभा मतदारसंघातील माजी जिल्हा परिषद, पंचायत समितीचे सदस्य, कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
